आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sajid Nadiadwala Flies In Mini Helicopters For Kick

\'किक\'मधील स्टंट दृश्ये मिनी हेलिकॉप्टरमधून शूट, पाहा Behind the Scene

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('किक'मधील एका दृश्याच्या शूटिंगदरम्यान कॅमेरा घेऊन उडणारे मिनी हेलिकॉप्टर.)
साजिद नाडियाडवालाच्या दिग्दर्शनामध्ये सलमान खानच्या सुपर स्टंटचे डिझाइन विदेशी टीमने केले असून त्याचे शूटिंग मिनी हेलिकॉप्टरमधून करण्यात आले आहे.
सलमानच्या अॅक्शनने भरलेला 'किक' साजिद नाडियाडवालाचा दिग्दर्शक म्हणून पहिलाच चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटात त्याला कसलीच उणीव ठेवायची नाही. यातील काही अॅक्शन दृश्यांचे शूटिंग हॉलिवूड चित्रपटाप्रमाणे करण्यात आले. खास दृश्ये हेलिकॉप्टरच्या साहाय्याने शूट करण्यात आले. दिल्ली आणि पोलंडमधील स्थळावर शूटिंग झाले. अॅक्शनसाठी जर्मनी आणि अन्य विदेशी स्टंट डायरेक्टरच्या टीमला पाचारण करण्यात आले होते. त्यांच्यासोबत नियोजित केलेल्या दृश्यांना मिनी हेलिकॉप्टरच्या मदतीने लॉस एंजिलिसमधून बोलावण्यात आलेल्या टीमने शूट केले.
सलमानने याबाबत सांगितले की, 'चित्रपटाच्या अॅक्शन सेटअपसाठी साजिदला खूप मेहनत घ्यावी लागली. अॅक्शन स्टारप्रमाणे सादरीकरण केले. मात्र या मोठया कॅन्व्हासला साजिदने बारकाईने तयार केले. त्यामुळे पडद्यावर दृश्यांमधील परिपूर्णता पाहता येईल. काही दृश्ये सामान्य पद्धतीने देखील शूट करता येत होते, पण बजेट वाचवण्याचा प्रयत्न साजिदने केला नाही.' दरम्यान, 'किक'चे प्रमोशन पाहता चित्रपट बॉक्स ऑफिसवर 250 कोटींचा गल्ला जमवू शकतो, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'किक'च्या सेटवर क्लिक करण्यात आलेली खास छायाचित्रे...