आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sajid Nadiadwala Give Tribute To His Wife Late Divya Bharti

'सात समंदर...' द्वारे साजिदने दिली दिव्या भारतीला श्रद्धांजली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साजिद नाडियाडवालाने आपली दिवंगत पत्नी दिव्या भारतीच्या पहिल्या चित्रपटातील गाणे 'किक'मध्ये समाविष्ट करत तिच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला आहे.
दिव्या भारतीच्या 1992 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विश्वात्मा'मधील 'सात समंदर पार..' गाणे बरेच गाजले होते. आता तिचे पती साजिद नाडियाडवालाने आपल्या दिग्दर्शनातील पहिला चित्रपट 'किक'मध्ये या गाण्याचा समावेश केला आहे.
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या 'किक'मध्ये नायक सलमान खान या गाण्यावर डान्स आणि लिप सिंक करताना दिसतो. आपल्या पहिल्या पत्नीला साजिदने याद्वारे श्रद्धांजली दिली आहे.
एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री असलेल्या दिव्याचे 5 एप्रिल 1993 रोजी 19 वर्षांची असताना निधन झाले होते. यापूर्वी साजीद - दिव्या लग्नबंधनात अडकले होते. 2004 मध्ये लग्न करण्याच्या अगोदर साजीद आपल्या प्रत्येक चित्रपटात दिव्याच्या आठवणी ताज्या ठेवण्याचा प्रयत्न करत होते. 'किक'मध्ये देखील साजिदने आपला हा प्रयत्न चालू ठेवला आहे. त्यासाठी साजिदने सारेगामा संगीत कंपनीला 1.5 कोटी रुपयांची मोठी किंमत देत हे गाणे खरेदी केले आहे.
साजिदने सांगितले की, 'हे गाणे चित्रपटाला अधिक खास बनवण्यासाठी मदत करेल. शिवाय चित्रपटातील हॅँगओव्हर गाण्यात माझा मुलगा सुबहान आणि सुफियान देखील दिसतील. ही माझी भावनिक सुरुवात आहे.