आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sakshi Tanwar And Sameer Kocchar Behind The Scenes exclusive Pics

EXCLUSIVE PICS : दुबईमध्ये 'बडे अच्छे लगते है'ची शुटिंग करतांना साक्षी-समीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोनी वाहिनीवरील 'बडे अच्छे लगते है' या लोकप्रिय मालिकेने आता पाच वर्षांची लीप घेतली आहे. मालिकेत लीड रोल मध्ये असलेल्या राम आणि प्रिया वेगळे झाले आहेत. मालिकेत आता समीर कोचर या नव्या चेह-याची एन्ट्री झाली आहे.
पाच वर्षे पुढे सरकल्यानंतर आता मालिकेचे शुटिंग दुबईच्या नयनरम्य लोकेशन्सवर सुरु आहे. आमच्या प्रतिनिधी टीना कृष्णन हे शुटिंग कवर करायला खास दुबईला गेल्या आहेत.
आमच्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीप्रमाणे, दुबईत या कलाकारांचे फक्त भारतीयच नाही तर परदेशी चाहतेही खूप आहेत. समीर आणि साक्षी तन्वरनेही आपल्या चाहत्यांना निराश न करता त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतले.
साक्षी-समीरची शुटिंग दरम्यान घेतलेली एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.