आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तारे-तारकांच्या मांदियाळीत रंगला 'सलाम पुणे' पुरस्कार सोहळा, पाहा क्षणचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - तारेतारकांची मांदियाळी, बहारदार संगीत, नृत्य आणि 'जुळुनी येती रेशीमगाठी'च्या प्राजक्ता-ललित या लोकप्रिय जोडीसह पुण्याची ख्यातनाम गौरी गाडगीळने आपापल्या 'आई'ला केलेला 'सलाम' यामुळे येथील महाराष्ट्र दिन सोहळा जेवढा आनंददायी, जल्लोषपूर्ण ठरला तेवढाच तो भावपूर्णसुद्धा ठरला.
'सलाम पुणे' या संस्थेच्या वतीने 1 मे रोजी पुण्यात उषाताई संजय काकडे, निर्माता विशाल गवारे, मच्छिंद्र धुमाळ, अभिनेत्री पूजा पुरंदरे, सलाम पुणेचे अध्यक्ष शरद लोणकर, अरुण लोणकर यांच्यासह प्रमुख मान्यवर, निर्माते -दिग्दर्शक आणि कलावंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र दिन सोहळा संपन्न झाला
झी मराठी वरील 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' या मालिकेला यावेळी उत्कृष्ट मालिकेचा 'सलाम पुणे 'पुरस्कार देवून गौरव करण्यात आला. अभिनेत्री स्पृहा जोशी, उमा सरदेशमुख, रमेश मेढेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय 'जुळुनी येती रेशीमगाठी' या मालिकेतील अभिनेत्री प्राजक्ता माळी आणि अभिनेता ललित यांना यावेळी उषा काकडे यांच्या हस्ते छोट्या पडद्यावरील लोकप्रिय चेहरा हा पुरस्कार देण्यात आला. ईटीव्ही वाहिनीवरी '१७६० सासूबाई ' या मालिकेला विनोदी मालिकेचा पुरस्कार देण्यात आला. अभिनेत्री निर्मिती सावंत, वर्षा तांदळे, निर्माती नीता लाड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
'यलो 'हा सिनेमा जिच्या जीवनावर निघाला ती पुण्याची आंतरराष्ट्रीय जलतरणपटू गौरी गाडगीळ आणि 'यलो'चे दिग्दर्शक महेश लिमये तसेच अभिनेत्री स्मिता गोंदकर, 'जावई विकत घेणे आहे'ची नायिका तन्वी पालव, कॅपेचिनो सिनेमाचे निर्माते संतोष देशपांडे यांनाही यावेळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'सलाम' या चित्रपटाचे निर्माते गौरव सोमाणी यांचाही यावेळी 'सलाम पुणे' पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
यावेळी प्राजक्ता माळी, ललित आणि गौरी गाडगीळ या तिघांनी हा सन्मान आपल्या आईला अर्पण केला. ते म्हणाले, ''आईनेच जन्माला घातले आणि तिनेच घडविले. त्यामुळे हा सन्मान हा आमच्या आईचाच आहे. पुण्यातला हा प्रतिष्ठेचा असा हा पहिलाच पुरस्कार मिळतो आहे, असे सांगून त्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.''
अभिनेत्री निर्मिती सावंत म्हणाल्या, ''सलाम पुणे हा पुरस्कार जाहीर होणे हाच मी चांगला पायगुण मानते.''
सोनिया बर्वे आणि मयूर लोणकर यांनी सादर केलेल्या 'ही पोळी साजुक तुपातील हिला… ' या नृत्यामध्ये स्वतः गौरीने उत्स्फूर्ततेने जल्लोषपूर्ण नृत्य सादर करून कलावंतासह सारे प्रेक्षागृह सहभागी करवून घेतले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सोहळ्याची खास क्षणचित्रे..