आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman, Amitabh Bachchan And Rajinikanth May Attend Narendra Modi\'s Swearing In

मोदींच्या शपथविधी सोहळ्यात हे सितारे लावणार चार चाँद?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभासाठी बॉलिवूडच्या अनेक स्टार्सना निमंत्रण देण्यात आले. राजकारणात बहुमतांच्या विजयाने सर्वत्र खळबळ उडवणारे मोदी जगभरातील सर्वात मजबूत असलेल्या लोकशाही भारत देशात 16वे पंतप्रधान म्हणून 26 मे रोजी शपथविधी घेणार आहेत.

भाजपाच्या सुत्रांच्या सांगण्यानुसार, शपथविधी समारंभात बॉलिवूडचा दबंग सलमान खान, महानायक अमिताभ बच्चन, गानकोकिळा लता मंगेशकर, रेखा, सुपरस्टार रजनिकांत आणि सलमानचे वडिल सलीम खान यांनासुध्दा मोदी यांनी आमंत्रित केले आहे.
एवढेच नाही तर, मोदी यांचे जवळचे मित्र मानले जाणारे लेखक सलीम खान यांनी शपथविधीमध्ये उपस्थित राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्या प्रकृतीने त्यांना साथ दिली तर ते सोमवारी (26 मे) राजधानी दिल्लीमध्ये शपथविधी समारंभात उपस्थित राहू शकतात.
भाजपाने बहुमताने विजय मिळवल्यानंतर भावी पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीची तयारी जोरात चालू आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील चर्चित दिग्गजांना उपस्थित राहण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सलमान खानने यापूर्वी मोदी यांच्यासोबत केली आहे पतंगबाजी...