आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Blackbuck Case: Bollywood Actor Salman Khan Appears In Jodhpur Court

लग्नघर सोडून बहिणीसोबत जोधपूरमध्ये पोहोचला सलमान, वकिलाला दिले लग्नाचे निमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बहीण अलविरासोबत सलमान खान)
जोधपूरः सिनेस्टार सलमान खान शुक्रवारी दुपारी जोधपूर न्यायलयात हजर झाला. यावेळी धाकटी बहीण अलविरा त्याच्यासोबत होती. खरं तर सलमानला सुनावणीवेळी न्यायालयात हजर न राहण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र तरीदेखील सलमान सुनावणीसाठी पोहोचला होता. 1998च्या काळविट शिकार प्रकरणाची ही सुनावणी होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी 8 डिसेंबरला होणार आहे. सलमान बहीण अलविरासोबत चार्टर्ड प्लेनने येथे पोहोचला.
खरं तर सलमान, सुनावणीला हजेरी लावण्यासोबतच गेल्या सोळा वर्षांपासून हा खटला लढवत असलेले त्याचे वकील हस्तीमल सारस्वत यांना बहीण अर्पिताच्या लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी येथे आला होता..
वकील सारस्वत यांनी सांगितले, की गेल्या सोळा वर्षांपासून हा खटला सुरु आहे. मात्र एवढ्या वर्षांत त्यांनी सलमानला कधीही रागात पाहिले नाही. सलमान त्यांना नेहमी हेच म्हणतो, की तुम्ही प्रयत्न करा न्याय नक्की मिळेल. सलमानची वागणूक सामान्य माणसांप्रमाणेच असते. या खटल्याविषयी त्यांनी कधीही सलमानला तणावात पाहिले नसल्याचे सांगितले. या खटल्याविषयी हस्तीमल यांचे सलमानशी फार कमी बोलणे होते. मात्र त्याचे कुटुंबीय यासंदर्भात त्यांच्याशी संपर्कात असतात. बहीण अलविरा नेहमी याविषयी चौकशी करत असते. त्याचे वडील सलीम आणि आई सलमा यांच्यासोबत सारस्वत यांचे कौटुंबिक नाते निर्माण झाले आहे.
कार्डसोबत दिली खजूरची मिठाईः
सलमानने सारस्वत यांनी अर्पिताच्या लग्नपत्रिकेसोबत खजूरची मिठाई दिली. मुस्लिम कुटुंबांमध्ये खजूरची मिठाई वाटण्याची परंपरा आहे. या कार्डमध्ये सलीम, सलमा आणि हेलन खान यांच्याकडून लग्नासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. तर सलमान, अरबाज, अलवीरा आणि सोहेल खान यांच्यावतीन 21 नोव्हेंबरच्या वेडिंग रिसेप्शन पार्टीचे निमंत्रण देण्यात आले आहे.
16 वर्षांत पहिल्यांदाच सारस्वत जाणार सलमानच्या घरी...
वकील सारस्वत यांनी भास्करला सांगितले, की गेल्या सोळा वर्षांत ते पहिल्यांदाच सलमानच्या घरी आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. खान कुटुंबीयांच्या वतीने अनेकदा त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे, मात्र ते पहिल्यांदाच सहकुटुंब त्यांच्याकडे जाणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा जोधपूरमध्ये अलविरासोबत पोहोचलेल्या सलमानची छायाचित्रे.
सोबतच पाहा सलमानने सारस्वत यांना दिलेली अर्पिताच्या लग्नाचे निमंत्रण...