आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Salman Arrives At Dr. Cabbie Music Launch To A Rousing Welcome!

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

टोरंटोमध्ये कतरिनाच्या बहिणीसह थिरकला सलमान खान, पाहा Pix

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडेः कतरिना कैफची बहीण इसाबेलसह डान्स करताना बॉलिवूड स्टार सलमान खान आणि उजवीकडे प्रेक्षकांचे अभिवादन स्वीकारताना सलमान)
मुंबई - बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान आपल्या आगामी 'डॉ. कॅबी' या कॅनडियन सिनेमाच्या म्युझिक लाँचच्या निमित्ताने अलीकडेच टोरंटोमध्ये पोहोचला होता. हा सिनेमा बीईंग ह्युमन ही सलमानची सामाजिक संस्था सादर करत आहे. येत्या 19 सप्टेंबर रोजी कॅनडात हा सिनेमा रिलीज होणार आहे. सलमानने या म्युझिक लाँच इव्हेंटमध्ये त्याची एक्स गर्लफ्रेंड कतरिना कैफची बहीण इसाबेलसह डान्स केला. या सिनेमाद्वारे इसाबेल फिल्मी दुनियेत पदार्पण करत आहे.
तब्बल दहा वर्षांनंतर सलमान खान टोरंटोमधील आपल्या चाहत्यांसमोर आला होता. शनिवारी टोरंटोमधील सिल्व्हरसिटी ब्रॅम्पटन मल्टीप्लेक्सच्या बाहेर हा म्युझिक लाँच इव्हेंट आयोजित करण्यात आला होता. मंचावर डॉ. कॅबीमधील दाल मखनी या गाण्यावर सलमानने इसाबेलसह ताल धरला होता. यावेळी सलमान आणि इसाबेलसह सिनेमातील कलाकार विनय विरमानी, कुणाल नैय्यरदेखील हजर होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या इव्हेंटची काही निवडक छायाचित्रे...