आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Back Home After Attending Swearing In Ceremony

मोदींच्या शपथविधी सोहळ्याहून परतला सलमान, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खान काल (26 मे) मुंबई एअरपोर्टवर दिसला. तचो नवी दिल्लीहून परतला होता. त्याला नरेंद्र मोदींच्या शपथविधी सोहळ्यामध्ये आमंत्रित करण्यात आले होते. शपथविधी सोहळ्यामध्ये बॉलिवूडमधून धर्मेंद्र, सलीम खान, अनुपम खेर, किरण राव, मधुर भंडारकर, पूनम ढिल्लन, विवेक ओबेराय हे स्टार्ससुध्दा उपस्थित होते.

सलमान जेव्हा एअरपोर्टमधून बाहेर निघाला तेव्हा ह्यूमन बीइंग लूकमध्ये दिसला. त्याने राखडी रंगाचा टी-शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केलेली होती. त्याने डोक्यावरील कॅप आपल्या तोंडात धरलेली होती. यावेळी त्याने एका चाहत्याला ओटोग्राफसुध्दा दिला. सलमान याचवर्षी मकर संक्रातीच्या निमित्ताने अहमदाबादमध्ये आयोजित एका खास कार्यक्रमामध्ये नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणावर सामील झाला होता. तिथे त्याने मोदींसह पतंगबाजी केली होती.
सलमान आपल्या 'किक' या आगामी सिनेमामध्ये बिझी आहे. 25 जुलै 2014 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमा सलमानसोबत रणदीप हुड्डा, नवाजुद्दीन सिद्दीकी, जॅकलिन फर्नांडिस, अर्चना पूरणसिंग, मिथुन चक्रवर्ती हे कलाकारसुध्दा काम करणार आहेत. सिनेमाचे दिग्दर्शन आणि निर्मिती साजिद नाडियाडवालाने केले आहे. हिमेश रेशमिया, यो यो हनीसिंग आणि मीत ब्रदर्स यांनी सिनेमाला संगीत दिले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून बघा एअरपोर्टवरील सलमानची काही छायाचित्रे...