आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Beat Me In The Big Boss Season 5, Akashdip Sahgel

'बिग बॉस'मध्ये सलमानने केली मला मारहाण... इति आकाशदीप सहगल

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सैफ अली खान आणि इक्बाल शर्मा यांच्यात झालेलं मारहाणीचं प्रकरण चांगलचं गाजत असतांना आता टीव्ही अभिनेता आकाशदीप सहगलने सलमानवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. 'बिग बॉस'च्या पाचव्या पर्वात आकाश स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. या कार्यक्रमाची सांगता होऊन एक महिन्यापेक्षा जास्त काळ लोटल्यानंतर आकाशने हा खळबळजनक आरोप सलमानवर केला आहे.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आकाशने सलमानवर त्याला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. आकाशने सांगितल्याप्रमाणे, सलमान मी आवडत नव्हतो. सलमान नेहमी मला इतर स्पर्धकांपेक्षा कमी लेखायचा. इतकचं नाही तर या कार्यक्रमादरम्यान सलमानने माझी छबी खराब करण्याचाही पूर्ण प्रयत्न केला होता. एकदा सलमानने माझ्यावर अचानक हात उचलाल, तेव्हा मला काय घडलं हे कळायला बराच वेळ लागला, असंही आकाशने म्हटलं आहे.
आता आकाश खरं बोलत आहे की खोट हे तर त्याचं त्यालाच ठाऊक. मात्र आकाशच्या या आरोपांना आता सलमान कसं उत्तर देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे हे नक्की.
बिग बॉस- 5: आकाशदीप सहगल 'गुडी बॉय' बनण्‍याचा प्रयत्‍न करतोय?