आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Hit And Run Case: Witness Fails To Appear In Court

हिट अॅण्ड रन प्रकरण- मुख्य साक्षीदार हजर न झाल्यामुळे सुनावणी टळली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिट अॅण्ड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला थोडा दिलासा मिळालाय. या प्रकरणी सेशन कोर्टात होणारी सुनावणी टळली. आता ही सुनावणी 8 एप्रिलला होणार आहे. सुनावणीदरम्यान तीन मुख्य साक्षीदार कोर्टात हजर न झाल्याने ही सुनावणी टळली. याचिकाकर्ते बुधवारी तीन मुख्य साक्षीदारांना कोर्टासमोर हजर करणार होते. त्यापैकी एक बांद्रा येथील लाँड्री मालक आहे. मात्र ही व्यक्ति पॅरालाईज असल्यामुळे तर दुस-या साक्षीदाराच्या घरातील सदस्याचे निधन झाल्याने कोर्टात हजर राहू शकले नव्हते. तर तिसरा साक्षीदार सध्या मलेशियात आहे.
2002 साली झालेल्या हिट एंड रन प्रकरणी सलमानच्या याचिकेवर सेशन कोर्टात सुनावणी होणार होती. वांद्रे कोर्टाने याप्रकरणी सलमानच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याचा आदेश दिला. वांद्रे कोर्टाच्या या निर्णयाविरोधात सलमानने सेशन कोर्टात अपील केले आहे. सदोष मनुष्यवधाचा खटला चालल्यानंतर सलमान दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते.
वाईल्ड लाईफ प्रोटेक्श कायद्याअंतर्गत सलानवर आरोप लावण्यात आलेत. त्यात अद्याप त्याच्यावर आरोप निश्चित झालेले नाहीत.