नवी दिल्लीः दिल्लीत सध्या सेलिब्रिटींची मांदियाळी जमली आहे. निमित्त आहे आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटिंगचे. या सिनेमात
सलमान खान आणि
करीना कपूर मेन लीडमध्ये आहेत. दिल्लीतील लाल किल्ला परिसरात या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे.
सिनेमाच्या सेटवर फावल्या वेळेत क्लिक करण्यात आलेले सलमान-करीनाचे सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याशिवाय आता शूटिंग सेटवरची छायाचित्रे बघायला मिळत आहेत.
हा सिनेमा कबीर खान दिग्दर्शित करत आहेत. अलीकडेच कबीर यांनी ट्विट करुन 'बजरंगी भाईजान'चे शूटिंग सुरु झाल्याची बातमी दिली होती.
‘बॉडीगार्ड’नंतर सलमान-करीना या सिनेमात सोबत काम करत आहेत. सध्या सैफ-करिना
सलमान खानसोबत कौटुंबिक संबंध दृढ करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सिनेमातील करिनाचा प्रवेश हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जात आहे. हा सिनेमा 2015च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा शूटिंगदरम्यानची खास छायाचित्रे...