मुंबई- बॉलिवूड अभिनेता
सलमान खान आणि
करीना कपूर सध्या कबीर खान दिग्दर्शित आगामी 'बजरंगी भाईजान' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहेत. दिल्लीत या सिनेमाचे शूटिंग सुरु आहे. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या सेटवर
सलमान खान आणि
करीना कपूर यांच्यावर सेल्फीची क्रेझ दिसून आली.
बुधवारी दिग्दर्शक कबीर खान यांनी ट्विट करुन 'बजरंगी भाईजान'च्या शूटिंगला सुरुवात झाल्याची बातमी दिली होती. शूटिंगच्या फावल्या वेळेत सलमान आणि करीना फोटोग्राफीच्या मूडमध्ये दिसले. यावेळी त्यांनी सेल्फी क्लिक केले.
'बजरंगी भाईजान' या सिनेमात हिंदू तरुणी आणि मुस्लिम तरुणाची लव्ह स्टोरी आहे. नवाजुद्दीन सिद्दीकीची महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहे. पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर सिनेमा
बॉक्स ऑफिसवर दाखल होणार आहे. यापूर्वी सलमान आणि करीनाची जोडी 'क्योंकि', 'बॉडीगार्ड' और 'मि. एंड मिसेज खन्ना' या सिनेमात दिसली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अन्य छायाचित्रे...