आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान करतोय गोविंदाची मनधरणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2007 मध्ये गोविंदा आणि सलमान या जोडीने 'पार्टनर'मध्ये धमाल उडवली होती. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारची धमाल उडवण्याचा सलमानचा प्रयत्न आहे. जर सलमानचे ताजे ट्विटस पाहिले तर त्याचा गोविंदासोबत पुन्हा एखादा चित्रपट करण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. 'पार्टनर' प्रदर्शित झाल्यापासूनच त्याचा सिक्वल बनवण्याचा विचार केला जात होता.
सलमानने गोविंदासोबतचे एक छायाचित्र ट्विट करत लिहिले आहे की, 'मी हा फोटो शेअर करत आहे. गोविंदाने माझ्यासोबत एक चित्रपट करावा, यासाठी मी त्याची मनधरणी करत आहे, पण माझा पार्टनर ही गोष्ट मान्यच करत नाही. माझे प्रयत्न सुरूच आहेत, पण तुम्हीदेखील मला यासाठी मदत करा.'
सलमान चार वर्षांपासून गोविंदाला चित्रपटासाठी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, गोविंदाने सलमानच्या या प्रस्तावाकडे आजपर्यंत दुर्लक्षच केले आहे. गोविंदा सलमानवर नाराज असल्याने त्याचा हा प्रस्ताव गोविंदा धुडकावत असल्याचे सांगितले जाते आहे. कारण आपली मुलगी नर्मदाला सलमानने लाँच करावे, अशी गोविंदाची इच्छा होती. सलमानने मात्र त्यावेळी नर्मदाऐवजी शत्रुघ्न सिन्हाची मुलगी सोनाक्षीच्या करिअरचा श्रीगणेशा केला होता. त्यामुळे गोविंदा तेव्हापासूनच सलमानपासून दूर राहण्याचा प्रयत्न करत आहे.