आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan And Jacqueline Starrer Kick's Poster Out

PIX: सलमान खानच्या 'किक'चे POSTER OUT, ईदच्या मुहूर्तावर होणार रिलीज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस स्टारर 'किक' या सिनेमाविषयी त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. सलमानच्या मागील 'जय हो' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवली नव्हती. मात्र त्याचा परिणाम सलमानच्या स्टारडमवर झाला नाही.
आता सलमानच्या आगामी 'किक'कडून चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.
पोस्टरमध्ये एक मास्क दाखवण्यात आले, त्यामुळे प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयी उत्सुकता
निर्माण झाली आहे. हा सिनेमा साजिद नाजियाडवाला यांनी दिग्दर्शित केला असून निर्मातेसुद्धा तेच आहेत. अलीकडेच सलमान आणि जॅकलीन शुटिंग करताना दिल्लीत दिसले.
हा सिनेमा 2009मध्ये रिलीज झालेल्या तेलगू सिनेमाचा रिमेक आहे. तेलगू सिनेमात दाक्षिणात्य स्टार रवी तेजा प्रमुख भूमिकेत होता.
सलमानचा 'किक' यावर्षी जुलै महिन्यात ईदच्या मुहूर्तावर थिएटरमध्ये दाखल होणार आहे. किकमध्ये सलमान आणि जॅकलीन यांच्यासह नवाजुद्दीन सिद्दीकी, रणदीप हुड्डा आणि मिथून चक्रवर्ती यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा किकच्या सेटवर क्लिक झालेली खास छायाचित्रे...