मुंबईः अभिनेता
सलमान खान मंगळवारी मुंबई विमानतळावर दिसला. त्याच्यासोबतच अनिल कपूर, राणी मुखर्जी हे स्टार्ससुद्धा विमानतळाच्या दिशेने जाताना दिसले. हे तिघेही स्टार रजत शर्मांच्या '
आप की अदालत' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी दिल्लीकडे निघाले होते.
यावेळी
सलमान खान टीशर्ट, जीन्स आणि लेदर जॅकेटमध्ये नेहमीप्रमाणे हँडसम दिसला. तर दुसरीकडे राणी मुखर्जी नवीन लूकमध्ये दिसली. तिने लाँग कुर्ता परिधान केला होता. शिवाय गळ्यात मोत्यांची माळ घातली होती. तिच्या हाता-पायावर मेंदी लागलेली दिसली. अभिनेता अनिल कपूर ब्लू टीशर्ट आणि जीन्समध्ये दिसले. यासर्वांसोबतच अभिनेता मुकेश खन्नासुद्धा विमानतळावर दिसले.
'आप की अदालत' या शोला 21 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिल्लीच्या प्रगती मैदानावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात
शाहरुख खान,
सलमान खान आणि
आमिर खान एका मंचावर आले होते.
या स्टार्ससोबतच राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मुंबई विमातळावर क्लिक झालेली स्टार्सची ही खास छायाचित्रे...