आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan At The Special Screening Of Ritesh Deshmukh Marathi Film Yellow

PICS: \'यलो\'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेला सलमान दिसला बिनधास्त अंदाजात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा दबंग सलमान खान 29 मार्च रोजी अभिनेत्यापासून निर्माता झालेल्या रितेश देशमुखच्या प्रॉडक्शन हाउसच्या दुस-या मराठी 'यलो' सिनेमाच्या स्क्रिनिंगसाठी यलो टी-शर्ट घालून पोहोचला होता. स्क्रिनिंगसाठी पोहोचलेला सलमान नेहमीसारखाच बिनधास्त अंदाजात दिसला.
सलमान व्यतिरिक्त स्क्रिनिंगसाठी बॉलिवूड अभिनेता गोविंदासुध्दा दिसला. तसेच रितेशसुध्दा त्याची पत्नी जेनेलिआ डिसूझासोबत उपस्थित होता. यावेळी सलमान उपस्थित होता म्हणून रितेश खूप आनंदी दिसला. 'यलो'च्या स्क्रिनिंगला अनेक स्टार्सनी उपस्थिती लावली.
रितेश देशमुखचा 'यलो' हा मराठी सिनेमा एका विशेष मुलीच्या जीवनपटावर आधारित आहे. यासारखा सिनेमा तुम्ही यापूर्वीसुध्दा बघितला आहे. 2007मध्ये आलेला आमिर खानचा 'तारे जमिन पर' हा देखील एका विशेष मुलाच्या जीवनपटावर आधारित सिनेमा आहे. रितेशने या सिनेमापूर्वी 'बालक पालक' या मराठी सिनेमाची निर्मिती केली होती. 'यलो' हा मराठी सिनेमा असून त्याचे दिग्दर्शन महेश लिमायेने केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'यलो' सिनेमाच्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या स्टार्सची काही खास छायाचित्रे...