मुंबईः सुपरस्टार
सलमान खानला नाती जपणे चांगले जमते आणि हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले आहे. अलीकडेच सलमान अभिनेता पुलकित सम्राटच्या लग्नात सहभागी झाला होता. गोव्यात हा लग्नसोहळा पार पडला.
या लग्नात सहभागी झालेल्या सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी सलमानने नववधू श्वेताचे कन्यादान केले. लग्नाच्या प्रत्येक विधींमध्ये त्याने आवर्जुन हजेरी लावली होती. श्वेता सलमानची मानलेली बहीण आहे.
आपल्या बहिणीच्या लग्नात सलमानने कुठली कमतरता ठेवली नाही. सलमानसह त्याचा भाऊ अरबाज खान आणि भावोजी अतुल अग्निहोत्रीसुद्धा या लग्नात सहभागी झाले होते.
पुलकित सम्राटने 'फुकरे', 'ओ तेरी' या सिनेमांमध्ये काम केले आहे. 'ओ तेरी' हा सिनेमा
सलमान खानने प्रोड्युस केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या लग्नाची निवडक छायाचित्रे...