आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Attends Pulkit Samrat's Wedding Reception In Delhi

पुलकीतच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाला होता सलमान खान, पाहा निवडक छायाचित्रे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(रिसेप्शनमध्ये पुलकीत आणि इतर पाहुण्यांसोबत सलमान खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेता सलमान खान सध्या आपल्या धाकट्या बहिणीच्या लग्नाच्या तयारीत बिझी आहे. मात्र काही दिवसांपूर्वी तो अभिनेता पुलकीत सम्राटच्या लग्नात सहभागी झाला होता. सलमानची मानलेली बहीण श्वेता रोहिरासोबत पुलकीतचे लग्न झाले आहे. या लग्नात सलमाननेच श्वेताचे कन्यादान केले आणि मोठ्या भावाच्या सर्व जबाबदा-या पार पाडल्या. सलमानसह अरबाज आणि सोहेल खान यांचीही हजेरी या लग्नाला होती.
गोव्यात पुलकीत आणि श्वेता विवाहबद्ध झाले. लग्नानंतर दिल्लीत रिसेप्शन पार्टी आयोजित करण्यात आली होती. या पार्टीतसुद्धा सलमान खानची विशेष हजेरी होती. याशिवाय ऋचा चड्ढा आणि अली फजल हे कलाकारदेखील नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. फुकरे या सिनेमात रिचा आणि अलीने पुलकीतसोबत काम केले आहे.
या रिसेप्शनची काही निवडक छायाचित्रे समोर आली आहेत. ही छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...