(अभिनेते विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्ना आणि सलमान खान)
मुंबईः बॉलिवूडचा सुपरस्टार
सलमान खान इंडस्ट्रीतील इतर स्टार्सना मदत करण्यासाठी
ओळखला जातो. त्याने अनेक यंग स्टार्सना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी मदत केली आहे. आता बातमी आहे, की अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्नाने बॉलिवूडमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि सलमान त्याच्यासाठी मेंटरचे काम करतोय.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, "सध्या साक्षी यूएसमध्ये अभिनयाचे धडे घेतोय. तर सलमान त्याला अभिनयाचे बारकावे शिकवत आहे. शिवाय बॉडी बनवण्यासाठी त्याला ट्रेनिंग देतोय. सलमान नेहमीच साक्षीची मदत करण्यासाठी तयार असतो आणि साक्षीसुद्धा त्याची प्रत्येक गोष्ट ऐकतोय. सलमानने त्याच्याकडून हार्ड वर्क करण्याची तयारी करुन घेतली आहे. शिवाय
आपल्या बिईंग ह्युमन प्रॉडक्शनअंतर्गत लाँच करण्याची तयारी सलमान करतो."
साक्षी खन्नाः
साक्षी खन्नाची पहिली ओळख म्हणजे तो अभिनेते आणि खासदार विनोद खन्ना यांचा मुलगा आहे. विनोद आणि त्यांची दुसरी पत्नी कविता यांचा तो मुलगा आहे. शिवाय या दाम्पत्याला एक मुलगी असून तिचे नाव श्रद्धा आहे. साक्षीला राहुल खन्ना आणि अक्षय खन्ना हे दोघे सावत्र भाऊ आहेत. राहुल आणि अक्षय विनोद आणि त्यांची पहिली पत्नी गीतांजली यांची मुले आहेत. वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई या सिनेमासाठी साक्षीने मिलन लुथरियाला असिस्ट केले होते. 2011 मध्ये मुंबईजवळील कर्जत परिसरात पोलिसांनी एका रेव्ह पार्टीवर धाड घातली होती, त्यावेळी तेथे साक्षीला अटक करण्यात आली होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा विनोद खन्ना यांचा मुलगा साक्षी खन्नाची छायाचित्रे...