आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Book Falaknuma Palace For Arpita Wedding

फलकनुमा पॅलेसमध्ये लग्नबेडीत अडकायचे होते दीया मिर्झाला, महागडे असल्याने रद्द केले प्लानिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- हॉटेल फलकनुमा पॅलेस)
नवी दिल्ली- बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने आपली धाकटी बहीण अर्पिताच्या लग्नासाठी हैदराबादचे 'फलकनुमा पॅलेस' हे पंचतारांकीत हॉटेल बुक केले आहे. हॉटेलचे सर्व 60 खोल्या बुक करण्यात आल्या आहे. एका दिवसासाठी एका खोलीचे भाडे जवळपास 40 हजार रुपये आहे.
फलकनुमा पॅलेसच्या सूत्रांच्या सांगण्यानुसार, बुधवारी (19 नोव्हेंबर) दुपारपर्यंत हॉटेल बुक करण्यात आले आहे. त्यासाठी सलमानने 3 कोटी रुपये मोजले आहेत. सलमानने हॉटेलच्या निजाम सूएटसुध्दा बुक केले आहे. त्याचे एका रात्रीचे भाडे 5 लाख रुपये आहे. हैदराबादची रहिवासी अभिनेत्री दीया मिर्झानेसुध्दा आपल्या लग्नासाठी फलकनुमा पॅलेस बुक करण्याची प्लानिंग केली होती. मात्र हॉटेलच्या महागड्या किंमतीने तिने हा प्लान रद्द केला होता.
सलमानला आवडते फलकनुमा
पहिल्यांदा बॉलिवूडच्या एखाद्या स्टारने हे हॉटेल बुक केले आहे. खान कुटुंबाच्या जवळच्या लोकांचे म्हणणे आहे, की सलमानला आपल्या बहिणीच्या लग्नासाठी फलकनुमा निवडण्याचे कारण म्हणजे, त्याला हे शहर आवडते. सलमानने हे हॉटेलदेखील आवडते. दुसरे कारण म्हणजे, येथील विमानतळवर मुंबईच्या तुलनेत कमी गर्दी असते. त्यामुळे लग्नात सामील होणा-या पाहुण्यांना लग्नात पोहचण्यास त्रास होणार नाही.,
कोण-कोण येणार?
अर्पिताच्या लग्नात सेलेब्सची मांदियाळी जमणार आहे. त्यामध्ये सिनेमा आणि राजकीय क्षेत्रातील देशभरातून पाहुणे सामील होणार आहेत. फिल्म इंडस्ट्रीमधून शाहरुख खान, अमिताभ बच्चन, आमिर खान, हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, करीना कपूर, सैफ अली खान सामील होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि आणि तेलगु सुपरस्टार चिरंजीवी त्यांचा मुलगा रामचरण तेजा आणि नागार्जुनसुध्दा सामील होणार आहे. तसेच, सलमान खानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुध्दा आमंत्रित केले आहे, मात्र बातम्यांनुसार परदेशी दौ-यावर असल्याने मोदी या लग्नात सहभागी होणार नाहीये. शिवाय, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनासुध्दा सलमानने आमंत्रण दिले आहे. मात्र यांच्या कार्यालयातून लग्नात सहभागी होणार की नाही अशी कोणतीच माहिती मिळालेली नाहीये.
कोणी बनवला होता फलकनुमा पॅलेस?
'फलकनुमा' हा उर्दू शब्द आहे. त्याचा अर्थ आकाशाप्रमाणे असा होतो. हैदराबादचा सहावा निजाम मीर महबूब अली खानने विंचूच्या आकारात बनवलेला हा फलकनुमा पॅलेस हैदराबादच्या चारमीनारपासून फक्त 5 किलोमीटर दूर आहे. 4 वर्षांपूर्वी हेरिटेज हॉटेलमध्ये रुपांतरीत केलेल्या फलकनुमा पॅलेसला ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स चालवते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा- अर्पिताच्या लग्नात पाहुण्याना काय वाढले जाणार आणि कोण आहे अर्पिताचा भावी पती आयुष शर्मा...