आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Busy On Phone During Bajrang Bhaijaan Shooting

PICS: शूटिंगवेळी फोनवर बिझी दिसला सलमान, ढाब्यावर केले जेवण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंडावा- सलमान खान आपल्या 'बजरंगी भाईजान' या आगामी सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी झाला आहे. या सिनेमाचे शूटिंग राजस्थानच्या झुझुनूच्या मंडावामध्ये सुरु आहे. शूटिंगदरम्यान सलमान खान ब्रेक मिळताच फोनवर बिझी झाला. यावेळी त्याचा जास्तित जास्त वेळ फोनवरच गेला. सलमान शूटिंगवेळी थोडा उदाससुध्दा दिसला. लंच ब्रेकमध्ये तो जवळच्या शाही पॅलेसमध्ये पायी गेला आणि पायीच परतला. चाहत्यांनी त्याला पाहण्यासाठी गर्दी केली तेव्हा त्याने हात वर करून अभिवादन केले.
शूटिंगचे दृश्य-
स्नेहराम लडिया वाड्याच्या समोर सकाळी-सकाळी गर्दी दिसली. जवळच्या राजस्थानी लूकमध्ये काही गाड्यांसोबत बाधलेले उंटसुध्दा होते. ढाब्यावर जेवण तयार होत होते आणि ग्राहक ढाब्यावर बसून गप्पा मारत होते. इतर स्टॉलसुध्दा लागलेले होते. अधून-मधून पोलिसांचे ये-जा चालू होती. अशा सेटवर सोमवारी (5 जानेवारी) 'बजरंगी भाईजान'चे दृश्य चित्रीत करण्यात आले. शूटिंगच्या दुस-या दिवशी मुख्य अभिनेता सलमान खाननेसुध्दा शूटिंग केले. त्याला पाहण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती.
सकाळी 11:30 वाजता सलमान कारने शूटिंगच्या ठिकाणी पोहोचला. जवळपास 15 मिनीटात शूटिंग सुरु झाले. सलमान खांद्यावर एक बॅग लटकावून हॉटेल समोर येतो. हॉटेल मालिक त्याला बसण्यास सांगतो. सलमान बॅग ठेवून हॉटेलमध्ये बसतो. वेटर जेवण घेऊन येतो. त्यावेळी काही पोलिस कर्मचारीसुध्दा तिथे फिरताना दिसतात. या ठिकाणी संध्याकाळपर्यंत शूटिंग चालू होती. चाहत्यांची गर्दीसुध्दा तशीच दिसून आली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानची मंडावामध्ये चालू असलेल्या शूटिंगची छायाचित्रे...