आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानसह सोनाक्षीने साजरी केली ईद, सल्लूच्या कुटुंबातही ईदचे जोरदार सेलिब्रेशन, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, सोनाक्षी सिन्हा, सलमान खान आणि शत्रुघ्न सिन्हा.)
मुंबई - बॉलिवूड स्टार सलमान खानसाठी यंदाची ईद खूप खास आहे. यावर्षी ईदच्या मुहूर्तावर सलमानचा 'किक' हा सिनेमा 100 कोटींकडे वाटचाल करतोय. त्यामुळे ही ईद सलमानसाठी आनंद घेऊन आली आहे. यंदाची ईद सलमानने आपल्या कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसह साजरी केली.
यावर्षी सलमानने ईदच्या निमित्ताने आपल्या चाहत्यांना एक मोठी ईदी दिली आहे. सलमानने ट्विटरच्या माध्यमातून 100 गरजू मुलांच्या उपचाराचा खर्च उचलणार असल्याची घोषणा केली आहे. ज्यांच्याकडे हृद्यरोगावर उपचार करण्यासाठी पैसे नाहीत, अशा गरजू मुलांच्या उपचाराचा खर्च सलमान करणार आहे.
सलमानने ट्विट केले, की जी मुले हृद्यरोगाने त्रस्त आहेत आणि त्यांच्या आईवडिलांकडे उपचारासाठी पैसे नाहीत, अशा 100 मुलांच्या उपचाराचा खर्च बीईंग ह्युमन करणार आहे. आपल्या पुढच्या ट्विटमध्ये सलमान म्हणाला, की खोटे बोलू नका आणि मुर्ख बनवू नका. त्यानंतर सलमानने आपला एक ईमेल आयडीसुद्धा दिला आहे. या ईमेलवर गरजू व्यक्ती सलमानशी संपर्क साधू शकतात.
ईदच्या दिवशी सलमान खान त्याचे वडील सलीम खान, आई सुशीला, भाऊ अरबाज, सोहेल, बहिणी अलविरा, अर्पिता, भावोजी अतुल अग्निहोत्री, अर्पिताचा भावी पती आयुश शर्मासह दिसत आहे. तर सोनाक्षी सिन्हाने आपल्या ट्विटर अकाउंटवर सलमान खान आणि वडील शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबतचे एक छायाचित्र पोस्ट करुन ट्विट केले, ''इस ईद अपनी किक जरूर लें।''
पुढील स्लाईड्समध्ये पाहा ईदच्या दिवशी क्लिक झालेली सलमानची त्याच्या कुटुंबीयांसोबतची खास छायाचित्रे आणि जाणून घ्या सलमानने काय ट्विट केले...