आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Celebrates The 20 Years Completion Of Hum Aapke Hain Koun

'हम आपके है कौन'ने पूर्ण केली 20 वर्षे, सूरज-सलमान करतायत सेलिब्रेशन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(हम आपके है कोन या सिनेमाचे पोस्टर)
मुंबई - सूरज बडजात्या यांचा फॅमिली ड्रामा असलेल्या 'हम आपके है कोन' या सिनेमाच्या रिलीजला आज 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 ऑगस्ट 1994 रोजी बॉक्स ऑफिसवर दाखल झालेल्या या सिनेमाने त्यावेळी कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडित काढले होते. शंभर कोटींची कमाई करणारा हा बॉलिवूडचा पहिला सिनेमा ठरला होता.
भारतीय मुल्य, परंपरा, रोमान्स आणि संस्कारांचे मिश्रण असलेला हा सिनेमा सेव्हेन्टी एमएमवर अवतरला आणि प्रेक्षकांनी थिएटरबाहेर एकच गर्दी केली होती. राजश्री बॅनरच्या या सिनेमाने सलमान खान आणि माधुरी दीक्षित यांचे करिअर यशोशिखरावर पोहोचवले. हा सिनेमा 1982 मध्ये रिलीज झालेल्या 'नदिया के पार' या हिंदी सिनेमाचाच रिमेक होता. हा सिनेमासुद्धा राजश्री प्रॉडक्शनचा होता. असे म्हटले जाते, की 'हम आपके है कोन' हा सिनेमा दिवंगत चित्रकार एम. एफ. हुसैन यांनी तब्बल 85 वेळा पाहिला आणि या सिनेमानंतरच ते माधुरी दीक्षितचे चाहते बनले होते.
या सिनेमाला पटकथा, दिग्दर्शन, संगीत आणि अभिनय या वेगवेगळ्या विभागात अनेक पुरस्कार मिळाले होते. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या सिनेमासाठी माधुरी दीक्षितला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता, तर दिग्दर्शक सूरज बडजात्यासुद्धा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी फिल्मफेअर पुरस्काराचे मानकरी ठरले होते.
सिनेमातील गाणी...
'हम आपके है कोन' या सिनेमातील सर्वच गाणी जबरदस्त हिट ठरली होती. यामध्ये एकुण 14 गाणी होती. 'दीदी तेरा देवर दीवाना...', 'माईन माईन', 'जूते दो पैसे लो' आणि 'हम आपके हैं कौन' ही सर्वच गाणी प्रचंड लोकप्रिय ठरली होती.
'प्रेम रतन धन पायो'च्या सेटवर सुरु आहे सेलिब्रेशन...
सिनेमाच्या रिलीजला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिग्दर्शक सूरज बडजात्या आणि सलमान खान यांनी 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाच्या सेटवर सेलिब्रेशनची तयारी केली आहे. सलमान सध्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचे शूटिंग करत आहे. सिनेमाला वीस वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सिनेमातील सर्व कलाकारांना एकत्र येणे शक्य होत नाहीये, त्यामुळे 'प्रेम रतन धन पायो'च्या टीमसोबतच सलमान सेलिब्रेशन करतोय. तब्बल पंधरा वर्षांनी सलमान सूरज बडजात्यांसह पुन्हा काम करतोय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'हम आपके है कोन' या सिनेमातील निवडक 10 छायाचित्रे...