आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणीच्या लग्नासाठी हैदराबादमध्ये दाखल होताच सलमानविरुद्ध विरोध-प्रदर्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानची बहीण अर्पिता हैदराबादमधील फलकनुमा पॅलेसमध्ये काही तासांनी लग्नगाठीत अडकणार आहे. परंतु हैदराबादमधील काही लोकांनी सोमवारी (17 नोव्हेंबर) सलमानच्या विरोधात विरोध प्रदर्शन केले. हैदराबादमध्ये सलमानच्या विरोधात गेल्या वर्षी एक तक्रार दाखल करण्यात आली होती.
'मुंबई वापस जाओ, हमे न्याय चाहिए' असा नारा लावत या लोकांनी अर्पिताचे लग्नस्थळ फलकनुमा पॅलेसपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. मुगलपुरा पोलिसांनी प्रदर्शन करणा-यांमधील पाच जणांना अटक केली आहे. फलकनुमा पोलिस स्टेशनमध्ये सलमानच्या विरोधात मुस्लिमांच्या धार्मिक भावना दु:खावल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याच्या बीइंग ह्यूमन एनजीओच्या वतीने आयोजित एका शोमध्ये मॉडेलने 'अल्लाह' लिहिलेला ड्रेस परिधान करून रॅम्प वॉक केला होता.
या प्रकरणावर सलमानचे वडील सलीम खान यांना प्रतिक्रिया मागितल्यास त्यांनी सांगितले, 'मी माझ्या मुलीच्या रिसेप्शनमध्ये सामील होण्यासाठी हैदराबादला जात आहे. मी या क्षणी केवळ एवढेच सांगतो, आज मी जगातील सर्वात आनंदी वडील आहे. आम्हाला कोणत्याही प्रदर्शनाविषयी काही ठाऊक नाहीये. आम्ही सर्व कुटुंबीय सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहोत.'