आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX: भेटा सलमान खानच्या कुटुंबाला, जाणून घ्या कोण-कोण आहेत कुटुंबात...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून (समोरच्या रांगेत) हेलन, सलमा, सीमा, निर्वाण, अयान, अरहान, सलीम खान आणि एलिजा. (मागील बाजूस) सोहेल खान, अतुल अग्निहोत्री, अलवीरा, सलमान खान, योहान, अर्पिता, अरबाज खान आणि मलायका अरोरा खान)
मुंबई - बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून अनेक बड्या घराण्याचा आणि कुटुंबाचा बोलबाला बघायला मिळतोय. यामध्ये बच्चन कुटुंबीय आणि कपूर घराण्याचा अनेक वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीवर दबदबा आहे.
या घराण्यातील अनेक पिढ्या फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत होत्या आणि नव्या पिढीनेसुद्धा याच क्षेत्रात काम करण्याची परंपरा कायम ठेवली. मात्र या दिग्गज कुटुंबामध्ये आणखी एक असे घराणे आहे, जे गेल्या अनेक वर्षांपासून येथे टिकून आहे.
या कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे या कुटुंबातील सर्व सदस्य आजही सोबत राहतात आणि प्रत्येक सुखदुःखात एकमेकांना साथ देतात. हे कुटुंब आहे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचं. सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी आजचा दिवस खूप खास आहे. कारण आज सलमानचा बहुप्रतिक्षित 'किक' हा सिनेमा रिलीज झाला आहे. सलमानप्रमाणेच त्याच्या कुटुंबातील बहुतेक सदस्य फिल्म इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. मात्र काहीजणांनी पडद्यामागे राहणे पसंत केले आहे. उदाहरणार्थ, सोहेल खानची पत्नी सीमा खान आणि सलमानच्या बहिणी अर्पिता आणि अलवीरा यांचा प्रत्यक्षपणे सिनेमांशी संबंध नाहीये.
सलमानचे वडील सलीम खान आपल्या काळातील प्रसिद्ध पटकथा लेखक होते. त्यांनी त्यांचे मित्र जावेद अख्तर यांच्यासह मिळून अनेक हिट सिनेमांची कथा लिहिली आहे. सलीम खान आणि जावेद अख्तर यांच्या जोडीने शोले हा गाजलेला सिनेमा भारतीय सिनेसृष्टीला दिला. मात्र त्यानंतर काही मतभेदांमुळे ही जोडी तुटली आणि नंतर दोघांचे मार्ग विभक्त झालेत.
आमच्या "KNOW स्टार परिवार सीरीज"च्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सलमान खानच्या कुटुंबात कोणकोण आहेत, ते सांगत आहोत...
पुढील स्लाईड्मध्ये जाणून घ्या कोणकोण आहेत सलमानच्या कुटुंबात...