आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने या श्रीलंकन ब्युटीला गिफ्ट केला 3BHK फ्लॅट!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान आणि जॅकलीन फर्नांडिस
मुंबई - अभिनेता सलमान खान आगामी 'किक' सिनेमातील त्याची को-स्टार जॅकलीन फर्नांडिसवर चांगला मेहरबान झालेला दिसतोय. ताजी बातमी अशी आहे, की जॅकलीन अलीकडेच मुंबईतील वांद्रा परिसरातील एका 3BHK फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे. विशेष म्हणजे हा फ्लॅट म्हणे तिला सलमान खानने भेट म्हणून दिला आहे. वांद्राच्या प्राईम लोकेशनवर स्थित हा फ्लॅट सलमानने अलीकडेच तिला गिफ्ट केला आहे.
दबंग सलमानच्या या भव्यदिव्य भेटवस्तूला बघता त्याने जॅकलीनला वाढदिवसापूर्वीच बर्थडे गिफ्ट दिल्याचे दिसून येत आहे. जॅकलीनचा वाढदिवस 11 ऑगस्ट रोजी असतो. मात्र सलमानने तिच्या वाढदिवसाची वाट न बघता तिला हा फ्लॅट भेट स्वरुपात दिला.
तसे पाहता सलमानने पहिल्यांदाच आपल्या एखाद्या को-स्टारला एवढी महागडी भेटवस्तू दिली असे नाहीये. यापूर्वी 'रेडी' सिनेमातील त्याची को-स्टार असिनलासुद्धा सलमानने एक फ्लॅट गिफ्ट केला होता.
आता सलमान जॅकलिनची स्तूती करण्यात बिझी आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने जॅकलिनला बॉलिवूडची पुढील झीनत अमान म्हटले होते. असो, सलमानच्या या गिफ्टमुळे जॅकलीन भारावून गेलीय, हे वेगळे सांगायला नको.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सलमान आणि जॅकलीन स्टारर 'किक' सिनेमातील काही छायाचित्रे...