आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Had Hosted A Special Screening Of Kick

Pix: सलमानने फॅमिलीसाठी ठेवले 'किक'चे स्पेशल स्क्रिनिंग, संगीता बिजलानीसुद्धा पोहोचली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('किक'च्या स्क्रिनिंगला मलायका अरोरा खान, सलमान खान आणि संगीता बिजलानी)
सलमान खानचा बहुप्रतिक्षित 'किक' हा सिनेमा आज रिलीज झाला. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी सलमानने गुरुवारी आपल्या फॅमिली आणि सिनेमाच्या स्टारकास्टसाठी स्पेशल स्क्रिनिंग आयोजित केले होते. या स्क्रिनिंगला सलमानची जवळची मैत्रीण संगीता बिजलानीसुद्धा सहभागी झाली होती.
यशराज स्टुडिओमध्ये आयोजित या स्क्रिनिंगमध्ये मलायका अरोरा खान, अमृता अरोरा आणि तिचे पती, सोहेल खान आणि अतूल अग्निहोत्री दिसले.
या स्क्रिनिंगवेळी संगीता बिजलानीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. संगीता सलमानची माजी प्रेयसी आहे. ब्रेकअपनंतसुद्धा संगीताचे सलमानच्या कुटुंबासह चांगले संबंध आहेत.
या स्क्रिनिंगमध्ये अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नर्गिस फखरी यांनी खूप मस्ती केली. या सिनेमाची पटकथा चेतन भगत यांची असून हिमेश रेशमिया, मीत ब्रदर्स आणि हनी सिंग संगीतकार आहेत. चेतन भगतचीही स्क्रिनिंगला विशेष उपस्थिती होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'किक'च्या स्क्रिनिंगला पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...