आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Hit And Run Case: Case Dairy Missing

सलमान खान हिट अँड रन प्रकरण: खरी कागदपत्रे आणि जबाब नोंदवलेली डायरी गहाळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: कोर्टातून बाहेर पडताना सलमान खान)
मुंबई: मुंबई सेशन कोर्टात गुरुवारी (21 ऑगस्ट) सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणाने नवीन वळण घेतले आहे. प्रकरणाच्या संबंधित काही कागदपत्र गहाळ झाल्याची माहिती मुंबई पोलिसांनी कोर्टात दिली. कोर्टाने या प्रकरणाची शहानिशा करणा-या अधिका-यांना कोर्टात हजर राहण्याचे आणि प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 12 सप्टेंबरला होणार आहे.
पोलिसांच्या सांगण्यानुसार, हिट अँड रन या प्रकरणातील महत्त्वाची कागदपत्रे आणि त्या दिवशी घडलेल्या घटनेची सविस्तर माहितीची नोंद असलेली डायरीदेखील गहाळ झाल्याची माहिती त्यांनी कोर्टात दिली आहे. पोलिसांच्या या स्पष्टीकरणानंतर कोर्टाने प्रकरणाचा तपास करणा-या अधिका-यांना 12 सप्टेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
कागदपत्रे गहाळ झाल्याने या कारवाईत अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. प्रकरणाची सुनावणी करताना कोर्टाने मुंबई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पोलिसांच्या अशा बेजबाबदार कार्यप्रणालीने नाराज झालेले सेशन कोर्टाचे न्यायाधीश डी. डब्लू देशपांडे म्हणाले, अशाप्रकारे महत्वाची कागदपत्रे गहाळ होत असतील तर प्रकरणाची कारवाई पुढे कशी चालणार?
गेल्या दोन महिन्यांपूर्वी कोर्टाने या प्रकरणातील खरी कागदपत्रे दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. मात्र अद्याप ही कागदपत्रे कोर्टात दाखल करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे या प्रकरणात आता पोलिसांचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या सांगण्याप्रमाणे, ज्या पोलिस कॉन्स्टेबलला या प्रकरणातील कागदपत्रे सांभाळण्याची जबाबदारी दिली होती त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र त्याच्या जागेवर आलेल्या कॉन्स्टेबलला याविषयी काहीच ठाऊक नाहीये.
जी कागदपत्रे गहाळ झाली आहेत त्याच्या झेरॉक्स कॉपी उपलब्ध आहेत. परंतु कोर्टात खरी कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. हरवलेल्या कागदपत्रांमध्ये 63 लोकांचे जबाब नोंदवलेले होते. कायदा तज्ञांच्या मते, कागपदपत्रे गहाळ झाल्यास सलमानची बाजू मजबूत होऊ शकते.