आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Host Biryani Party On The Sets Of Bajrangi Bhaijaan

'बजरंगी भाईजान'च्या सेटवर सलमानची 'बिर्याणी पार्टी', पाहा सेटवरील Photos

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- कबीर खान आणि सलमान खान)
मुंबई- सुपरस्टार सलमान खान कधी-कधी पार्टी देण्याच्या मूडमध्ये असतो आणि बिर्याणी त्याच्या पार्टीचा एक महत्वाचा पदार्थ असतो. काही दिवसांपू्र्वी 'प्रेम रतन धन पायो' सिनेमाच्या सेटवर त्याने बिर्याणी पार्टी दिली होती. अशीच एक पार्टी त्याने 'बजरंगी भाईजान'च्या सेटवरसुध्दा दिली.
'बजरंगी भाईजान'चे शूटिंग राजस्थानमध्ये करत असलेल्या सलमानला माहित झाले, की त्याचे टीम मेंबर्स रोज तेच तेच जेवण करून कंटाळले आहेत. त्याने लगेच आपल्या आचा-याला बोलावून त्यांच्यासाठी एक बिर्याणी पार्टाचे आयोजन केले. अर्पिता आणि आयुषसुध्दा त्यावेळी सेटवर होते. सर्वांनी बिर्याणीचा आनंद घेतला. बिर्याणीसोबतच काही मांसाहारी पदार्थसुध्दा होते.
दिग्दर्शक कबीर खान 'बजरंगी भाईजान'चे शूटिंग संपले आहे. सिनेमात सलमान खानशिवाय करीना कपूरसुध्दा मुख्य भूमिकेत आहेत. ईदच्या मुहूर्तावर हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'बजरंगी भाईजान'च्या सेटवरील सलमानची चाहत्यांसोबतची काही नवीन छायाचित्रे...