आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीसह घालवणार वेळ, पाहा दोघांचे Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: सलमान खान आणि सोमी अली)
मुंबई: सलमान खान त्याच्या 'डॉ. कैबी'च्या प्रमोशनसाठी टोरंटोला पोहोचला आहे. सलमान 'डॉ कैबी'चा निर्माता असून तो या प्रोजेक्टसाठी उत्साही दिसत आहे. हा सिनेमा पुढील महिन्यात रिलीज होत आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, सलमान खान या प्रोजेक्टशिवाय आणखी एका गोष्टीसाठी उत्साही आहे. सलमान टोरंटोने त्याच्या जवळची मैत्रीण आणि एक्स गर्लफ्रेंड सोमी अलीसह वेळ घालणार असल्याच्या चर्चा आहेत. दोघांच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले, की सोमीने सलमान खानला मियामी बीच परिसरातील घरी वेळ घालवण्यासाठी बोलावले आहे. माजी बॉलिवूड अभिनेत्री सोमी अली आता 'नो मोर टियर्स' संस्था चालवते. ही संस्था डोमिस्टक वॉयलेंस आणि ह्यूमन ट्रॅफिकिंगने त्रस्त लोकांची मदत करते.
सलमान खानदेखील त्याच्या 'ह्यूमन बीइंग' या संस्थेला व्यवस्थित आणि सुरळीतरित्या चालवण्यासाठी सोमीचा सल्ला घेत असतो. सलमानने त्याच्या एनजीओचे नाव सोमीकडून प्रेरित होऊन ठेवले आहे. सोमीच्या टी-शर्टवर बीइंग ह्यूमन वाचून सलमानने त्याच्या एनजीओचे नाव 'बीइंग ह्यूमन' ठेवले. आता सलमान आणि सोमी यांच्या भेटीच्या बातम्या रंजक ठरणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमान खान आणि सोमी अली यांची निवडक छायाचित्रे...