आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actor Salman Khan Invite PM Narendra Modi For Sister Arpita's Wedding

अभिनेता सलमानने घेतली पंतप्रधानांची भेट, बहिणीच्या लग्नाचे दिले आमंत्रण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता सलमान खानने गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. नवी दिल्लीत ही भेट झाली. सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी सलमान खानने पंतप्रधानांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. यावेळी सलमानसोबत त्याची बहीण अलवीरा अग्निहोत्रीसुद्धा उपस्थित होती.
अर्पिता खानचे लग्न दिल्ली स्थित आयुषसोबत येत्या 18 नोव्हेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. अर्पिता सलीम खान आणि हेलन यांनी दत्तक घेतलेली मुलगी आहे.
यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला सलमानने पाठिंबा दर्शवत हातात झाडू घेऊन कर्जत येथे साफसफाई केली होती. पंतप्रधानांच्या या अभियानाचे त्याने कौतुकही केले होते. याशिवाय गुजराज काइट फेस्टिव्हलवेळी दोघांची भेट झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.
आता नरेंद्र मोदी सलमानचे आमंत्रण स्वीकारून अर्पिताच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या भेटीदरम्यानची छायाचित्रे...