नवी दिल्ली: बॉलिवूड अभिनेता
सलमान खानने गुरुवारी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. बहीण अर्पिता खान हिच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी
सलमान खानने पंतप्रधानांची भेट घेतली होती. यावेळी सलमानसोबत त्याची बहीण अलवीरा अग्निहोत्रीसुद्धा उपस्थित होती. यावेळी नरेंद्र मोदी आणि
सलमान खान यांच्यात बराच वेळ चर्चा रंगली. अर्पिताचे येत्या 18 नोव्हेंबर रोजी लग्न आहे. नरेंद्र मोदी यांनी सलमानसोबतच्या या भेटीचा व्हिडिओ यूट्युबवर शेअर केला आहे. या बातमीतील पाचव्या स्लाईडमध्ये तुम्हा हा व्हिडिओ बघू शकता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाला सलमानने पाठिंबा दर्शवत हातात झाडू घेऊन कर्जत येथे साफसफाई केली होती. पंतप्रधानांच्या या अभियानाचे त्याने कौतुकही केले होते. याशिवाय गुजराज काइट फेस्टिव्हलवेळी दोघांची भेट झाली होती. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.
आता नरेंद्र मोदी सलमानचे आमंत्रण स्वीकारून अर्पिताच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा मोदी-सलमान यांच्या भेटीची छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडमध्ये पाहा या दोघांच्या भेटीचा व्हिडिओ...