आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Keeps Asking Me If I Am Sure About Marrying Arpita Says Ayush Sharma

आयुष म्हणाला सलमान विचारायचा, 'तू खरंच माझ्या बहिणीशी लग्न करणार?'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सलमान खान, आयुष शर्मा आणि अर्पिता)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण आज लग्नगाठीत अडकणार आहे. ती लाँग टाइम बॉयफ्रेंड आयुष शर्मासोबत बोहल्यावर चढणार आहे. हैदराबाद येथे हा लग्नसोहळा पार पडणार आहे.
आयुष दिल्लीचा बिझनेसमॅन आहे. सुपरस्टार सलमान खानच्या बहिणीसोबत आयुषची भेट बॉलिवूडमध्ये संघर्ष करत असताना झाली. त्यांच्या ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले आणि आता दोघे लग्न करत आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, आयुष शर्माने सलमानसोबतच्या बाँडिगबाबत एक मुलाखत दिली. आयुषने या मुलाखतीत सांगितले, की त्याची खान कुटुंबातील प्रत्येक सदस्यसोबत एक वेगळे बाँडिंग आहे. त्याने असेही सांगितले, 'खान कुटुंबातील सर्व सदस्य माझ्यापेक्षा मोठे आहेत. त्यामुळे मी सर्वांचा आदर करतो. मी सर्वांवर खूप प्रेम करतो.
सलमान भाई मला विचारतात, 'तुला माझ्या बहिणीसोबत खरंच लग्न करायचे आहे का?'
आयुषने पुढे सांगितले, अर्पिताच्या आई-वडिलांसोबतसुध्दा माझे पटते. इतकेच नव्हे माझ्या होणा-या सासूसोबतसुध्दा (सलमा खान) माझी चांगली बाँडिंग आहे. त्या आम्हा दोघांच्या चांगल्या मैत्रीण आहेत. हेलन आँटीसोबतसुध्दा माझे नाते खूप फ्रि आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात आदर आणि प्रेम आहे.
यावेळी आयुषने आपल्या बॉलिवूडमध्ये करिअर करण्याच्या स्वप्नाविषयीसुध्दा सांगितले. सलमान मला लाँच करणार हे खोटी बातमी आहे. मला माझ्या पायावर उभे राहायचे आहे, तेही स्वत:च्या कष्टाने. सध्या मी अभिनेता होण्याचे धडे घेत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आयुष शर्माची छायाचित्रे...