आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किक : प्रेक्षकांची ईद आणि सलमान खानला ईदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानसोबतच निर्माता साजीद नाडियाडवालादेखील 'किक'चा प्रमुख आधारस्तंभ बनला आहे. चित्रपट व्यवसायातील यश सामान्यत: दहा टक्क्यांच्या वर नसते. मात्र, गेल्या दोन दशकांमध्ये साजीदने जवळपास 95 टक्के यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली आहे. सामान्य गुंतवणूकदार असण्याबरोबरच साजीद नाडियाडवालास व्यावसायिक चित्रपटांची चांगली जाण आहे.
सलमानने या चित्रपटात अभिनयाच्या बदल्यात सॅटेलाइट आणि संगीताचे अधिकार आपल्याकडे ठेवले आहेत. त्याची बाजारातील किंमत जवळपास 60 कोटी इतकी आहे. यूटीव्ही/डिज्नीने साजीदकडून भारतात व विदेशामध्ये वितरणाचे अधिकार 105 कोटींमध्ये खरेदी केले आहेत. विविध क्षेत्रांतल्या वितरकांनीदेखील आपल्या भागासाठी हा चित्रपट मोठ्या किमतीमध्ये यूटीव्हीकडून खरेदी केला आहे. पहिल्या प्रोमोने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल आकर्षण निर्माण केले आहे.
दोन सुपरहिट गाण्यांमुळे चित्रपटाला अधिकच धार मिळाली आहे. ईदची तारीख सलमान खानसाठी लकी आहे. गेल्या काही वर्षांत ईदला रिलीज झालेल्या 'वाँटेड', 'दबंग', 'बॉडीगार्ड', 'एक था टायगर'ने अनेक नवीन विक्रमांची नोंद केली आहे. 'किक' दक्षिण भारतातील सुपरहिट चित्रपटाचा रिमेक आहे. 200 कोटी क्लबमधील सलमानचा हा पहिलाच चित्रपट असेल.
सलमान प्रेक्षकांचे मनोरंजनाद्वारे पैसे वसूल करेल, तर प्रेक्षक सलमानला विक्रमी यशाची ईदी देऊन त्याचे कौतुक करतील. उद्योग आणि प्रेक्षकांमध्ये 'किक' आमिर खानच्या 'धूम-3'च्याही पुढे जाणार का, हा चर्चेचा विषय बनला आहे.