आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यंदाची ईद बदलणार सलमानचे बॉक्स ऑफिसवरील गणित?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

27 जुलै रोजी या वेळची ईद साजरी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. 27 जुलैच्या दोन दिवस अगोदर सलमानचा 'किक' प्रदर्शित होतोय. चित्रपटातील तज्ज्ञांनी मात्र या दोन्ही परिस्थितीला आपापल्या हिशेबाने फायदा-तोट्याच्या अंदाजात बांधले आहे. सलमानसाठी ही ईद एकतर खास राहील, नाही तर नुकसानदायक ठरेल, असे दिसत आहे.
सलमान खानच्या 'किक'च्या रिलीजबाबत चित्रपट तज्ज्ञांमध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे. हा चित्रपट खरे तर शुक्रवार, 25 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. वास्तविक, रमजान महिना अजून सुरू झाला नाही. मात्र, विशेषज्ञांनी या वेळची ईद रविवार, 27 जुलै रोजी येत असल्याचे स्पष्ट केले आहे. याच्या आधारे 'किक'च्या व्यवसायातील गणिताचा अंदाज बांधला जात आहे. जर ईद 27 जुलैला निश्चित असेल, तर त्या दिवशी रविवार आहे. त्यामुळे चित्रपटाचा सुरुवातीचा व्यवसाय 25-30 टक्के कमी राहील. म्हणजे पहिल्या दिवशी जर 25 कोटीचा व्यवसाय होणे अपेक्षित असेल, तर तो 20 कोटी इतकाच होईल. चित्रपटाच्या व्यवसायाच्या आकड्यांचे हे गणित समोर आल्यानंतर दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला आणि निर्मिती कंपनी डिस्नी/ यूटीव्हीच्या लोकांमध्ये दोन वेगवेगळी मत-मतांतरे निर्माण झाली आहेत.
सविस्तर वृत्त वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...