आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन म्युझिक कंपन्यांमुळे सलमानची झाली गोची

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानला स्टारचे महत्व ओळखण्यासह संगीतात असलेल्या ज्ञानासाठीसुध्दा इंडस्ट्रीमध्ये मानले जाते. फिल्म इंडस्ट्रीमध्ये संगीत क्षेत्रात स्पर्धा वाढली आहे. यावेळी त्याच्या सिनेमासाठी दोन मोठ्या कंपनींमध्ये स्पर्धा लागली आहे. टी-सीरीज आणि झी म्युझिक या दोन्ही संगीत कंपन्यांची आपसात स्पर्धा लागली आहे.
पुढील ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणारा कबीर खान दिग्दर्शित अद्याप नाव न ठरलेला सिनेमा, सूरज-अथिया अभिनीत 'हीरो', 'हॅप्पी डेज' आणि 'शिक्षणाच्या आयचा घो!' या मराठी सिनेमाच्या हिंदी रिमेकचे संगीत अधिकार खरेदी करण्यासाठी सलमान समोर झी म्युझिकने 20 कोटींचा प्रस्ताव मांडला आहे. चार सिनेमांमधील केवळ एका सिनेमात सलमान आहे. मात्र 'झी'ला विश्वास आहे, की सलमान आपल्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये तयार झालेल्या इतर तीन सिनेमांच्या संगीतावर उत्कृष्ट काम करू शकतो.
तसे पाहता, नवोदित अभिनेत्यांना घेऊन तयार करण्यात आलेल्या सिनेमांना इतकी मोठी रक्कम ऑफर होत नाही. या ऑफरनंतर विरुध्द कंपनी टी-सीरीजमध्ये खळबळ उडाली आहे. टी-सीरीजचे दिग्दर्शक भूषण कुमार सलमानच्या 'रेडी' सिनेमाचा निर्माता होता. सल्लूच्या सिनेमांचे संगीत अधिकार आतापर्यंत त्याच्याकडेच देण्यात आलेले आहेत. भूषणने आपल्या जवळच्या संबंधाच्या आधारे झी म्युझिक एवढीच रक्कम सलमानला ऑफर केली आहे.
त्याला कोणत्याही परिस्थिती सलमानच्या सिनेमाच्या संगीताचे अधिकार खरेदी करायचे आहेत. सुत्रांच्या सांगण्यानुसार, प्रतिष्ठेचा प्रश्न बनलेल्या या डिलमध्ये भूषण 20 कोटींच्या रकमेमध्ये आणखी 2-3 कोटी रुपये जोडायला तयार आहे. पुढील 15 दिवसांमध्ये या डिलवर निर्णय घेतला जाणार आहे.