आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PIX:सलमानने केले 'ख्वाब'चे म्युझिक लाँच, दिसला वेगळा अंदाज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या हस्ते आगामी 'ख्वाब' या हिंदी सिनेमाचे म्युझिक लाँच करण्यात आले. यावेळी सिनेमातील स्टारकास्ट हजर होती. जाएद अली खान दिग्दर्शित या सिनेमात सिमर मोटिआनी आणि नवदीप सिंह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संदीप आणि साजिद अली चंदवानी हे या सिनेमाचे संगीतकार आहेत.
सलमानच्या उपस्थितीने या म्युझिक लाँच सोहळ्याला चारचाँद लागले. यावेळी त्याने ब्लू जीन्स आणि नेवी ब्लू कलरचा शर्ट त्याने परिधान केला होता. यावेळी सलमान मस्तीच्या मुडमध्ये दिसला. त्याचे वेगवेगळे मूड यावेळी कॅमे-यात कैद करण्यात आले.
लॅपटॉपच्या माध्यमातून सलमानने ख्वाबचे म्युझिक लाँच केले. ख्वाब हा एक रोमँटिक ड्रामा असून जाएद अली खान यांनी सिनेमाचे दिग्दर्शने केले आहे. मरोद अली खान यांची निर्मिती असलेल्या या सिनेमात नवदीप आणि सिमरसह बजरंगबली सिंह, ऋषी मिगलानी आणि नफिसा अली यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. येत्या 9 मे रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा 'ख्वाब'च्या म्युझिक लाँच सोहळ्याची खास छायाचित्रे...