आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2727 हा आहे सलमानच्या कारच्या लकी नंबर, पाहा त्याचे लग्झरी कार कलेक्शन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- आपल्या Range Rover Vogue कारसह सलमान खान)
नोट : 'स्टार्स ऑन व्हिल' या आमच्या स्पेशल सीरिजअंतर्गत आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच अभिनेता सलमान खानच्या लग्झरी कार आणि बाइक कलेक्शनविषयी सांगत आहोत. याशिवाय त्याच्या लाइफस्टाइलविषयी तुम्हाला या पॅकेजमधून जाणून घेता येणार आहे.
बॉलिवूडमध्ये दबंग नावाने प्रसिद्ध अभिनेता सलमान खान देशातील लोकप्रिय कलाकार आहे. कमाईत तो शाहरुखच्या मागे आहे, मात्र लोकप्रियतेत तो किंग खानला टक्कर देताना दिसतो. फिल्मी फॅमिलीतून असूनदेखील सलमान खूप लो-प्रोफाइल आयुष्य व्यतित करतो. इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सलमानला त्याच्या वडिलांनी मदत केली नसल्याचे आपल्या सर्वांनाच ठाऊक असेल. स्वबळावर त्याने येथे आपले अस्तित्व निर्माण केले आहे. सलमानकडे भरपूर पैसे असूनदेखील त्याने नवीन कार खरेदी न करता सेकंड हँड खरेदी केली होती. 'जमाना' या सिनेमात ती कार वापरण्यात आली होती. या सिनेमाची स्क्रिप्ट सलीम खान यांनी लिहिली होती.
मात्र आता सलमानकडे रेंज रोवर, बीएमडब्ल्यू सीरीजपासून ते ऑडीपर्यंतच्या अनेक आलीशान कारचे कलेक्शन आहे. त्याच्या कारचा नंबर 2727 हा आहे. हा त्याचा लकी नंबर आहे. कारण त्याचा वाढदिवस 27 डिसेंबरला असतो. सलमानच्या आवडत्या रेंज रोवर कारचा हाच नंबर असून त्याने अलीकडेच खरेदी केलेल्या ऑडी RS7 चासुद्धा हाच नंबर आहे.
सलमानचे लग्झरी कार कलेक्शन...
सलमानला BMW सीरीजच्या कार पसंत आहेत. त्याच्याकडे या सीरीजच्या चार कार (बीएमडब्ल्यू XB, बीएमडब्ल्यू X6, बीएमडब्ल्यू M3 आणि बीएमडब्ल्यू M5) आहेत. याशिवाय रेंज रोवर, ऑडी Q7, ऑडी A-8, ऑडी RS 7, बीएमडब्ल्यू X6, मर्सडीज बेंज, टोयोटा लँड क्रूजर, लेक्सस या कारसुद्धा त्याच्याकडे आहेत.
जाणून घ्या सलमानच्या लाइफस्टाइलविषयी...
- सलमानचे संपूर्ण कुटुंब मुंबईतील वांद्रा परिसरात वास्तव्याला आहे. त्याच्या घराचे नाव गॅलेक्सी अपार्टमेंट आहे.
- मुंबईतील पनवेलजवळ त्याचे फार्महाऊस असून येथे तो आपल्या कुटुंबासह पार्टी साजरी करत असतो.
- सलमानला रोलेक्स कंपनीच्या घड्याळी पसंत आहेत.
- बीईंग ह्युमन ही त्याचे स्वतःचे फाउंडेशन आहे. सलमान बीईंग ह्युमन लिहिलेल्या टी-शर्टमध्ये नेहमी दिसतो. तर त्याचे आवडते सूट्सचे ब्रॅण्ड हे अरमानी आहे.
- जीन्स आणि टी-शर्च हे त्याचे आवडते आउटफिट आहे.
- भारतीय डिझायनर्समध्ये एश्ले रिबेलो आणि विक्रम फडणीस त्याचे फेव्हरेट आहेत.
- फूड लव्हर सलमानचे मुंबईतील आवडते रेस्तराँ चाइना गार्डन आहे.
- त्याचे आवडते हॉलिडे डेस्टिनेशन लंडन आणि दुबई आहे. दुबईत सलमानचे एक घरसुद्धा आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सलमान खानचे लग्झरी कार आणि बाइक कलेक्शन...