आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PICS : चिमुकल्या चाहत्याला भेटून सलमान झाला आनंदीत, \'किक\'च्या शुटिंगवेळी झाली भेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा दबंग अर्थातच अभिनेता सलमान खानचे चाहते सर्व ठिकाणी आहेत. वयाने लहान असो, किंवा मोठा, प्रत्येकजण सलमानला पसंत करतो. अशाच एका चाहत्यासोबत सलमानची अलीकडेच महबूब स्टुडिओच्या बाहेर भेट झाली. सलमानच्या या चाहत्याचे वय केवळ 5 वर्षे आहे. आपल्या या चिमुकल्या चाहत्याला भेटून सलमान खूप आनंदीत झाला होता. यावेळी सलमानने बराच वेळ आपल्या या चाहत्यासोबत घालवला.

स्टुडिओत सलमान ब्राउन शर्ट आणि ब्लॅक पँटमध्ये दिसला. येथे तो आपल्या आगामी 'किक' सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी होता. या सिनेमात जॅकलिन फर्नांडिस लीड रोलमध्ये आहे. तर साजिद नाडियादवाला या सिनेमाचे दिग्दर्शक आणि निर्माता आहेत.
महबूब स्टुडिओत सलमानने या सिनेमातील ईदच्या गाण्याचे शुटिंग केले. या गाण्याचे शब्द आहेत 'जुम्मे की रात हैं...' हिमेश रेशमियाने हे गाणे कंपोज केले आहे. या गाण्यासाठी स्टुडिओत मोठा सेट उभारण्यात आला होता. सलमान आणि जॅकलीनसह रणदीप हुड्डा आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सलमानची चिमुकल्या चाहत्यासोबतची छायाचित्रे...