आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan News In Marathi, Black Buck Case, Supreme Court

काळवीट शिकार: 28 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्ट सुनावणार सलमानच्या भाग्याचा फैसला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बहुचर्चित काळविट शिकार प्रकरणी बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्ट येत्या 28 ऑक्टोबरला सलमान खानच्या भाग्याचा फैसला सुनावणार आहे.

काळ्या काळविटाची शिकार केल्याप्रकरणी सलामानला राजस्थानमधील एका कोर्टाने दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. मात्र नंतर राजस्थान हायकोर्टाने सलमानच्या शिक्षेच्या निर्णयाला स्थगिती दिली होती.

परंतु, कायदा हा सगळ्यांसाठी सारखाच आहे, असे सांगत सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी राजस्थान हाय कोर्टाच्या निर्णयावर ताशेरे ओढले आहे. तसेच 28 ऑक्टोबरपासून सलमानसाठी वाईट दिवस सुरू होण्याची शक्यता आहे, अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने सलमानला फटकारले आहे.

सलमानने गेल्या महिन्यात सुप्रीम कोर्टात एक माफीनामा सादर केला होता. आपण देशात सगळ्यात जास्त प्राप्त कर भरणारा व्यक्ती असल्याचे सलमानने कोर्टात सादर केलेल्या माफीनाम्यात म्हटले होते. तसेच विविध कार्यक्रमानिमित्त आपल्याला कोणत्याही देशात जावे लागते, यामुळे आपल्याला विदेशात जाण्यास परवानगी मिळावी, अशी विनंतीही सलमानने कोर्टाकडे केली होते.
येत्या 28 ऑक्टोबरला सुप्रीम कोर्ट सलमानबाबत अंतिम निर्णय सुनावणार आहे. सुप्रीम कोर्ट सलामाच्या भाग्याचा काय फैसला करते, याकडे सलमानच्या सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
(फाइल फोटो: बॉलिवूड अभिनेता सलमान खान)