सलमानकडे बी-टाऊनमधील अनेक अभिनेत्रींचा गॉड फादर म्हणूनदेखील बघितले जाते. सलमानने त्याच्या एक्स गर्लफ्रेंड
कतरिना कैफपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत सर्वांनाच करिअरचा आलेख उंचवण्यास मदत केली आहे. आता सलमानच्या चाहतींमध्ये जॅकलिनचेसुध्दा नाव जोडले जाणार आहे. खास गोष्ट अशी, की सलमान इंडस्ट्रीच्या एका प्रसिध्द निर्मात्याला जॅकलिनचे नाव सुचवत आहे. अलीकडेच, सलमानने 'किक'चा ट्रेलर लाँचनिमित्तावर जॅकलिनविषयी सांगितले, की ती इंडस्ट्रीतील कष्टाळू अभिनेत्रींपैकी एक आहे.
सलमानने असेही सांगितले, की शुटिंगदरम्यान जॅकलिनने थोडेसुध्दा नखरे दाखवले नाहीत. एवढेच नाही तर, जॅकलीन इंडस्ट्रीची दुसरी झीनत अमान असून तिला बॉलिवूडमध्ये मोठे करिअर असल्याचेही सलमान म्हणाला.