आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: बाईकस्वार चाहत्यांवर भडकला सलमान, कारमधून उतरुन केला पाठलाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(कारमधून बाहेर येऊन बाइकर्सवर राग व्यक्त करताना सलमान खान)
मुंबई- अलीकडेच सलमान खानचा एका व्हिडिओ व्हायरल झाला, त्यामध्ये तो काही बाईक चालवणा-यांवर राग व्यक्त करताना दिसतोय. ही घटना राजस्थानच्या झुंझुनमध्ये घडल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी सलमान तिथे आपल्या आगामी 'बाजीराव मस्तानी' सिनेमाचे शूटिंग करत होता. सलमान आपल्या व्हाइट मर्सिडिजमध्ये बसून शूटिंगसाठी रवाना झाला, तेव्हा काही बाईक चालवणा-या तरुणांनी त्याचा पाठलाग केला. ही तरुण सलमानचा फोटो काढण्याचा आणि व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करत होते.
यावेळी एक बाईक सलमानच्या मर्सिडिज समोर आली. त्या बाईकचा धक्का सलमानच्या गाडीला लागला. हे पाहून सलमानचा पारा चढल्याने त्याने रस्त्याच्या मधोमध मर्सिडिज थांबवली आणि बाईकर्सचा पाठलाग केला. सलमानचा राग पाहून बाईकर्सनी तिथून धूम ठोकली.
व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकायला येते, की काही बाईकर्स सलमानच्या विरोधात अपशब्दांचा वापर करत होते. मात्र सलमानने सर्वांना दुर्लक्ष केले आणि कारमध्ये बसून निघून गेला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानसोबत घडलेल्या या घटनेची काही छायाचित्रे...