मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून करण जोहरच्या 'शुध्दी'च्या मार्गात येणारे अडथळे दूर झाले आहेत. सलमान खानने स्वत: याचे स्पष्टीकरण दिले आहे, की करण जोहरच्या 'शुध्दी'मध्ये तो मुख्य भूमिका साकारत आहे. करणनेसुध्दा याचे स्पष्टीकरण दिले आहे.
सलमान खानपूर्वी या सिनेमात हृतिक रोशन काम करणार असल्याचे अंदाज व्यक्त केले जात होते. मात्र, सलमान आणि करण यांनी स्पष्टीकरण देऊन अंदाजांना पूर्णविराम लावला आहे. करणने असाही खुलासा केला, की 2016मध्ये सिनेमा दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज केला जाणार आहे. मुख्य अभिनेत्याचे नाव निश्चित झाले असून अभिनेत्री मात्र अद्याप फायनल करण्यात आली नाहीये. याविषयी
करीना कपूरचे नाव चर्चेत आहे.
यापूर्वी हृतिक आणि प्रियांका ही जोडी काम करणार असल्याचे सांगितले जात होते. पुन्हा हृतिकसह प्रियांका नसून दीपिका रोमान्स करणार असे म्हटले जाऊ लागले होते. मात्र करणने औपचारिकरित्या या प्रोजेक्टविषयी कधीच काही सांगितले नाही. या सर्वांच्या नावाची चर्चा झाल्यानंतर करीनाने असे सांगितले होते, की करणने 'शुध्दी'चा प्रोजेक्ट सध्या
टाळला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करण जोहरने केलेल टि्वट...