(फाइल फोटोः निकोल साबा)
बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच अभिनेता
सलमान खान लवकरच एका विदेशी मॉडेलसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करताना दिसणार आहे. मात्र एखाद्या सिनेमात नव्हे तर एका जाहिरातीत हे दोघे झळकणार आहेत. या विदेशी मॉडेलचे नाव आहे निकोल साबा. निकोल ही अरब मॉडेल, गायिका आणि अभिनेत्री आहे.
स्प्लॅश या फॅशन ब्रॅण्डने
सलमान खानची निवड ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून केली आहे. या ब्रॅण्डच्या प्रमोशनसाठी सलमानने अलीकडेच निलोकसोबत एक जाहिरात शूट केली आहे.
कोण आहे निकोल साबा...
40 वर्षीय निकोल लेबनानची पॉप गायिका आहे. 1998 ते 2001 या काळात ती लेबनीज पॉप ग्रुप 'द 4 कॅट्स'ची सदस्य होती. या ग्रुपसोबत तिने दोन अल्बम आणि चार शॉर्ट व्हिडिओ लाँच केले आहेत. 2003 मध्ये तिचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता. यानंतर तिने सोलो सिंगिंग सुरु केले आणि 2004 मध्ये पहिला अल्बम रिलीज केला. आत्तापर्यंत निकोलने ब-याच सिनेमांमध्ये अभिनय केला आहे.
2004 मध्ये एका मॅगझिनच्या वतीने तिला सर्वोत्कृष्ट गायिकेचा पुरस्कारसुद्धा मिळाला आहे. आत्तापर्यंतच तिचे आठ सिंगल अल्बम रिलीज झाले आहेत. नोव्हेंबर 2011 मध्ये निकोलने लेबनानेच बिझनेसमन युसुफ अल खालसोबत लग्न केले.
पुढील स्लाईडमध्ये पाहा जाहिरातीच्या एका छायाचित्रात सलमान खानसोबत निकोल...