आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Sister Arpita Wedding Venue Preparation Update

अर्पिता-आयुषच्या लग्नासाठी असे सजवले जात आहे फलकनुमा पॅलेस, पाहा Pics

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फलकनुमा पॅलेस)
मुंबई: रविवारी (16 नोव्हेंबर) सलमान खानच्या मुंबईमधील गॅलक्सी अपार्टमेन्टमध्ये अर्पिता खानच्या लग्नापूर्वी ग्रँड स्टाइलमध्ये वेडिंग सेलिब्रेशन करण्यात आले. मंगळवारी (18 नोव्हेंबर) हैदराबादच्या फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिताचे लग्न होणार आहे. खान कुटुंबीयां लग्नासाठी सोमवारी (17 नोव्हेंबर) मुंबईहून हैदराबादला रवाना झाले आहेत.
यावेळी फलकनुम पॅलेसमध्ये लग्नाची जोरदार तयारी चालू आहे. संपूर्ण फलकनुमा पॅलेसला लाइट्स आणि फुलांनी सजवले जात आहे. एका सूत्रांच्या सांगण्यानुसार, या जोरदार तयारीकडे पाहून असे वाटत आहे, की हैदराबादमध्ये जाणूकाही एकाजा फेस्टिव्हल आयोजित केला जात आहे. पॅलेसचे लोक महलाच्या प्रत्येक कानाकोपरा सजवत आहेत.
सध्या फलकनुमा पॅलेसचे गार्डन परिसर वधू-वरासाठी सजवले जात आहे. पाहुणे इथेच दोघांना आशीर्वाद देणार आहेत. संपूर्ण गार्डनमध्ये डिस्को लाइट्स लावले जाणार आहे. शिवाय डिनर परिसरमध्येसुध्दा कलर लाइट्स लावले जाणार आहेत. खान कुटुंबीय सोमवारी (17 नोव्हेंबर) संध्याकाळी सजावटीची पाहणी करण्यासाठी फलकनुमा पॅलेसवर पोहोचणार आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा फलकनुमा पॅलेसमध्ये चालू असलेल्या तयारीची छायाचित्रे...