आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा चढला सलमानचा पारा, स्वतःच्याच बॉडीगार्डच्या श्रीमुखात लगावली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : सलमान खान)
मुंबई : बॉलिवूडचा दबंग खान अर्थातच सलमान पुन्हा एकदा वादामुळे चर्चेत आला आहे. सलमानने स्वतःच्याच बॉडीगार्डच्या श्रीमुखात लगावल्याची ताजी बातमी आहे. ही घटना मुंबईतील वांद्रेच्या मेहबूब स्टुडिओत घडली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेहबूब स्टुडिओत सलमान 'किक' या सिनेमाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आला होता. त्यावेळी तिथे त्याच्याभोवती चाहत्यांचा गराडा जमला. यावेळी एका चाहत्याने फोटो काढण्याच्या उद्देशाने सलमानला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. यावेळी या चाहत्याला त्याच्या बॉडीगार्डने हटकले आणि त्याच्याशी गैरव्यवहार करण्याचा प्रयत्न केला. बॉडीगार्डचे हे कृत्य पाहून संतापलेल्या सलमानने त्याला थापड मारली. इतकेच नाही, तर त्याने उपस्थित सर्व लोकांना चेतावनी दिली, की त्यांनी त्याच्या चाहत्यांसह कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन करु नये.
पुढे वाचा, सलमानचा राग आणि फोटोग्राफर्सवर बॅन... यासह सलमानशी निगडीत अलीकडच्या काळातील गॉसिप्स...