(फलकनुमा पॅलेसमध्ये अर्पिता खानचे लग्न होणार आहे.)
मुंबईः
सलमान खानची बहीण अर्पिता या महिन्यात लग्नगाठीत अडकणार आहे. त्यामुळे बॉलिवूडचा हा 'दबंग'
आपल्या लाडक्या बहिणीच्या लग्नात कोणतीही कसर शिल्लक ठेऊ इच्छित नाहीये. जर तुम्ही हैदराबाद येथील प्रसिद्ध 'फलकनुमा पॅलेस'मध्ये स्टे करण्याचा विचारात असाल, तर ते तुम्हाला शक्य होणार नाहीये. कारण सलमानने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी हा संपूर्ण पॅलेस एक आठवड्यासाठी बूक केला आहे.
याच ठिकाणी 16 नोव्हेंबरला सलमानची बहीण अर्पिता आणि तिचा दिल्लीस्थित बॉयफ्रेंड आयुष लग्नगाठीत अडकणार आहेत. या लग्नासाठी 40 लाख रुपये प्रति दिवसाप्रमाणे हा पॅलेस सलमानने बूक केला आहे. अर्थातच खान फॅमिलीने या पॅलेसचे एका आठवड्याचे भाडे तीन कोटी रुपये दिले आहेत.
या पॅलेसचे एकुण 60 सुएट तब्बल 250 पाहुण्यांसाठी बूक आहेत. यापैकी 46 रुम नॉर्मल गेस्टसाठी तर व्हीआयपी गेस्टसाठी 3 ग्रॅण्ड सुएट, 7 रॉयल सुएट आणि 3 हिस्टोरिकल सुएट बूक करण्यात आले आहेत. वधू आणि वरासाठी प्रेजिडेंशिअल सुएट बूक करण्यात आले आहे.
या पॅलेसशी निगडीत एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, प्रिजिडेंशिअल सुएटचे एका दिवसाचे भाडे 5 लाख रुपये आहे. तर बेसिक रुम्सचे भाडे 40 हजार रुपये प्रतिदिन आहे. हे केवळ लग्नस्थळाचे भाडे आहे. यावरुन खान कुटुंब डेकोरेशन, कपडे आणि ज्वेलरीसह इतर गोष्टींवर किती खर्च करणार आणि अर्पिताचा लग्नसोहळा किती भव्यदिव्य असेल, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा अर्पिताचे लग्नस्थळ असलेल्या 'फलकनुमा पॅलेस'ची खास छायाचित्रे...