झुंझुनू- बॉलिवूड कलाकार
सलमान खान सध्या
आपल्या आमागी 'बजरंगी भाईजान' सिनेमाच्या शूटिंगसाठी राजस्थानच्या मंडावामध्ये आहे. येथेच आमिरच्या '
पीके'चेसुध्दा शूटिंग झाले होते.
शनिवारी शूटिंगमधून वेळ काढून सलमानने खारूताईला आपल्या हाताने अन्न खाऊ घातले. शनिवारी सकाळी शूटिंगवर जाताना हॉटेलच्या बगीचामध्ये सलमान ब्रेकफास्ट करत होती.
झाडावर त्याला एक खारूताई दिसली. त्याने आपण खात असतेले पदार्थ त्या खारुताईला खाऊ घातले. खारूताईसुध्दा घाबरता खाऊ लागली. त्यानंतर सलमान काहीवेळ अन्न आपल्या खांद्यावर ठेऊन झाडाला टेकून उभा राहिला. खारूताई त्याच्या खांद्यावरून एक एक अन्नाचा तुकडा घेऊन खाऊ लागली. सलमानची ही छायाचित्रे हॉटेलच्या एका कर्मचा-याने क्लिक केले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा खारूताईला खाऊ घातलानाची आणि शूटिंग सेटवर चाहत्यांसोबत सलमानने काढलेली काही छायाचित्रे...