आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman Khan Spotted With Fans At InterContinental Poland

PIX:पोलंडच्या रस्त्यांवर चाहत्यांच्या गराड्यात अडकला सलमान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान सध्या पोलंडमधील वारसों येथे आहे. येथे तो आपल्या आगामी 'किक' या सिनेमाचे शुटिंग करतोय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, याठिकाणी 'किक'च्या क्लायमॅक्सचे शुटिंग सुरु आहे.
सलमानचे चाहते जगभरात आहेत. त्यामुळे सलमान जेव्हा वारसोंच्या रस्त्यांवर फेरफटका मारायला निघाला, तेव्हा त्याची भेट घेण्यासाठी त्याचे अगणिक चाहते तेथे जमा झाले होते. झालं असं, की सलमान फूडी आहे आणि भारतीय तंदूरी कबाब आणि बिर्यानी त्याची फेव्हरेट आहे. त्यामुळे वारसों येथे पोहोचल्यानंतर सलामन चांगल्या भारतीय रेस्तराँच्या शोधात निघाला. यावेळी सलमानला जवळून बघण्यासाठी त्याच्या चाहत्यांनी त्याला गराडा घातला आणि त्याची भेट घेतली. सलमाननेसुद्धा आपल्या चाहत्यांची निराशा न करता त्यांची भेट घेतली. यावेळी सलमानसह रणदीप हु़ड्डासुद्धा हजर होता.
वारसों येथील वारसों पॅलेस ऑफ कल्चर अॅण्ड सायन्स या सर्वात उंच इमारतीवर सिनेमाती हाय ऑक्टेन अॅक्शन सीन चित्रीत करणार आहे. एक महिन्याच्या शुटिंगनंतर सिनेमाचे संपूर्ण युनिट मुंबईत परतणार आहे. निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी या सिनेमाद्वारे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे.
बॉलिवूडचे आवडते ठिकाण वारसों...
पोलंड बिझनेस फ्रेंडली देश समजला जातो आणि येथील लोक बॉलिवूड सिनेमांना आपली पसंती दर्शवत असतात. आत्तापर्यंत येथे शाहरुख खानची जादू चालली. आता या यादीत सलमान खानच्या नावाचाही समावेश झाला आहे. नऊ वर्षांपूर्वी येथे आमिर खान, काजोल आणि सुनील शेट्टी स्टारर फना या सिनेमाचे शुटिंग झाले होते. हा सिनेमा कुणाल कोहली यांनी दिग्दर्शित केला होता.
पुढील स्लाईड्सवर पाहा, चाहत्यांच्या गराड्यात असलेल्या सलमानची खास छायाचित्रे...