आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Salman khan stops vijay galani from making films

सलमानशी पंगा घेतल्‍यावर होतात वाईट परिणाम

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान त्‍याच्‍याशी चांगले वागणा-यांना नेहमीच सहकार्य करतो. पण, कुणी त्‍याच्‍याशी वाईटपणा घेतला तर मात्र तो त्‍याची खोड मोडल्‍याशिवाय राहात नाही. नुकताच याचा प्रत्‍यय निर्माते विजय गलानी यांना आला.
सलमान खानने गलानी यांच्‍या 'वीर' या चित्रपटात काम केले होते. चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर जोरदार आपटला. परिणामी, गलानी यांनी सलमानला चित्रपटाचे मानधनच दिले नाही. जवळपास 15 कोटी रूपये अडकल्‍यामुळे सलमानने त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठवली. गलानी यांनी मात्र ती नोटीस म्‍हणजे केवळ कागदाचा तुकडा आहे असे समजून त्‍याकडे दुर्लक्ष केले. पण त्‍यानंतर सलमानने हे प्रकरण 'फेडरेशन ऑफ वेस्‍टर्न इंडिया सिने एम्‍प्‍लॉईज'पर्यंत नेले.
फेडरेशनने या प्रकरणाची गंभीर दखल घेत गलानींना नोटीस पाठवली आहे. या नोटिशीनुसार, जोपर्यंत सलमानचे मानधन दिले जात नाही तोपर्यंत गलानी एकही चित्रपट बनवू शकत नाहीत.
आता सलमान खानला त्‍याचे मानधन मिळेल की नाही आणि तो गलानी यांना माफ करेन की नाही हे लवकरच समोर येईल.